ब्रोशरनुसार नाही, तुमच्या वीजबिलानुसार सोलर
प्रत्येक बसवणुकीची सुरुवात मोफत जागा पाहणीने होते. आम्ही छताची दिशा, झाडे व पाण्याच्या टाक्यांची सावली, मंजूर वीजभार आणि मागील काही महिन्यांची वीजबिले पाहतो. त्यानंतर योग्य सिस्टीम आकार सुचवतो — चाळीसगावातील साधारण घरासाठी बहुतेक वेळा २ ते ३ kW.
ऑन-ग्रिड की ऑफ-ग्रिड?
ऑन-ग्रिड सिस्टीम महावितरणच्या नेट मीटरिंगसोबत काम करते: तुम्ही न वापरलेली वीज ग्रिडला जाते व बिलात वजा होते. यासाठी बॅटरी लागत नाही आणि ती पीएम सूर्य घर अनुदानासाठी पात्र असते. ऑफ-ग्रिड सिस्टीम बॅटरी वापरते व शेती, दूरची ठिकाणे किंवा वारंवार वीज जाणाऱ्या भागांसाठी योग्य असते.
पीएम सूर्य घर अनुदान — आम्ही पूर्ण करतो
पोर्टल नोंदणी, महावितरण रूफटॉप अर्ज, कागदपत्रे, नेट-मीटर पाठपुरावा, तपासणी आणि अनुदान दावा — सर्व आम्ही करतो. प्रत्येक टप्प्याची माहिती तुम्हाला WhatsApp वर मिळते.
यात काय समाविष्ट आहे
पॅनल, इन्व्हर्टर, गॅल्व्हनाइज्ड स्ट्रक्चर, AC व DC डिस्ट्रिब्युशन बॉक्स, अर्थिंग, लाइटनिंग अरेस्टर, केबलिंग, नेट व जनरेशन मीटर — आमची स्वतःची टीम बसवते व तपासते.